ओळखा पाहू कोणता फॉन्ट?



आजची पोस्ट विशेष करून ग्राफिक डिझायनर्स किंवा कमर्शियल आर्टिस्ट मित्रांसाठी...
खूप वेळा एखादा लोगो परत रिक्रिएट करताना आपल्यापुढे प्रश्न पडतो की हा फॉन्ट कुठला? 
मी तुम्हाला विचारलं की गुगलच्या लोगोसाठी कोणता फॉंट वापरला आहे सांगू शकाल? तुम्ही म्हणाल, कसं शक्य आहे? त्यांनी वापरलेला फॉंट आपण ओळखूच शकणार नाही. आणि ओळखून करणार काय? 
आपण फॉंट अॅडिक्ट असलो तर मात्र एखादा नवा लोगो दिसला की हा फॉंट कोणता, हे चटकन ओळखतो  किंवा याच्याएेवजी तो फॉंट वापरला असता तर डिसेंसी आली असती, अशी चर्चा करतो . पण काही वेळेला एखादा नवा फॉंट आपण ओळखू शकत नाही. तो आपल्याला कुठेतरी वापरायचा तर असतो, पण त्याचा सोर्स कळत नाही. अशा वेळी व्हॉट द फॉन्ट नावाची सेवा वापरून तुम्ही तो फॉन्ट कोणता आहे, हे ओळखू शकता. 

व्हॉट द फॉन्ट ही सेवा वापरण्यास अतिशय सोपी आहे. ज्या लोगोमधील फॉन्ट ओळखायचा आहे तो लोगो अथवा लोगो एखाद्या साईटवर असल्यास त्याची लिंक अपलोड करायची. त्यानंतर व्हॉट द फॉन्टमार्फत लोगोवरून कॅरेक्टर्स ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. उदा. तुम्ही गुगलचा लोगो अपलोड केला असल्यास लोगोतील G, o, o, g, l, e ही कॅरेक्टर्स बरोबर आहे किंवा कशी हे विचारले जाते. त्यात चूक असल्यास तुम्ही दुरूस्ती करू शकता. त्यानंतर सर्च म्हटल्यावर या लोगोसाठी वापरलेल्या फॉन्टचे नाव डिस्प्ले होते. त्याच फॉन्टशी साधर्म्य असलेले अनेक फॉन्टस असतील तर त्यांची यादी पाहायला मिळते. 

गुगलच्या लोगोसाठी वापरलेला फॉंटः Catull BQ-Regular.
वापरून बघा आणि कॉमेंट करा..

Thanks to
Nov 17




नमस्कार मित्रांनो,
आजची पोस्ट विशेषतः वेब डिझायनर्स मित्रांसाठी सर्वाधिक उपयुक्त आहे.

एखादी साईट अोपन होताना खूप वेळ लागला तर समजायचं की त्या साईटवर खूप हेवी फाईल्स आहेत. या सर्व फाईल्स डाऊनलोड होण्यासाठी वेळ लागतो. टेक्स्टची साईज इतर कन्टेन्टपेक्षा कमी असते. इमेजेसची साईज कमी न केल्यास वेबसाईट ओपन होण्यास वेळ लागतो. सोशल नेटवर्किंग साईटवरदेखील इमेजेस अपलोड करताना फाईल साईज अमूक एमबीपर्यंत असावी असा मेसेज दिला जातो. त्याहून अधिक साईजच्या इमेजेस अॅक्सेप्ट केल्या जात नाहीत. इमेजेसची फाईल साईज कमी करण्यासाठी प्रयत्न केले तर त्याचा दर्जा कमी होऊ शकतो. पण दर्जा कमी न करतादेखील ‘हेवी’ इमेजेसचे ‘वजन’ कमी करता येते... स्मश ईट ही सेवा वापरून आपण इमेजेसची फाईल साईज कमी करू शकतो. या सेवेचा फायदा म्हणजे फाईलचा दजर्जाही कायम राहतो आणि फाईल साईज किती टक्क्यांनी कमी झाली हे कळते. फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर वापरून तुम्ही या गोष्टी लीलया करू शकता. पण त्यात इमेजचा दर्जा घसरण्याची शक्यता असते. स्मश ईटमध्ये विशिष्ट इमेज अॉप्टिमायझेशन तंत्रज्ञान वापरून बाईट्स रिड्यूस केले जातात. त्यामुळे इमेजच्या व्हिज्युअस क्वालिटीला धक्का लागत नाही. स्मश ईटचा वापर तीन मार्गांनी करता येतोः  १. स्मश ईटवर जाऊन एक किंवा अनेक इमेजेस अपलोड करणे  २. इमेज कुठे होस्ट केलेल्या असतील तर त्यांच्या लिंक्स देणे  ३. फायरफॉक्स एक्स्टेंशनचा वापर करून इमेज साईज कमी करणे. 

साईज कमी केलेल्या इमेजेस तुम्ही झिप स्वरूपात डाऊनलोड करून घेऊ शकता. वेबसाईट डिझायनर्स किंवा अपलोडर्स यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयोगी आहे. वापरून बघा आणि उपयुक्तता कळवा.

with thanks from
Oct 14

नमस्कार मित्रांनो,

आजचा विषय थोडा वेगळा आहे. इंटरनेटवर सर्फींग करताना लोगो डिझाईनवरचा हा लेख वाचण्यात आला. त्यातले मुद्दे तुमच्यापुढे मांडतोय.

आपण सगळे डिझायनर्स विविध प्रकारचे लोगो बघतो, करतो. पण असा एखादाच लोगो असतो की जो मनाला भावतो. नकळत आपल्या तोंडून शब्द बाहेर पडतात, ``आईला, 1 नंबर लोगो आहे''.  हा लोगो 1 नंबर उगाचच होत नाही त्यामागे कोणीतरी केलेला अभ्यास आणि विचार असतो. असा हा 1 नंबर लोगो क्रिएट करायचा तर तो खाली सांगीतल्याप्रमाणे असला पाहिजे.

1.) या लोगोमागे काहीतरी विचार, अभ्यास असला पाहिजे. आणि तो विचार सांगता आला पाहिजे. (It must be describable)
2.) हा लोगो लक्षात राहण्याजोगा पाहिजे. (It must be memorable)
3.) हा लोगो रंगाशिवाय इफेक्टिव असला पाहिजे.  (It must be effective without colour)
4.) आणि हा लोगो विविध आकारात स्केलेबल असला पाहिजे. म्हणजे 1 सेंटीमीटर पासून 1 फूटापर्यंत कितीही आकारात व्हिजिबल असला पाहिजे.

यापैकी पहिला आणि दुसरा पॉईंट एकमेकांशी संबंधित आहेत.  जर तुम्ही लोगो तयार करताना त्यामागे काही विचारच नसेल तर तो समजावून सांगणार कसा? आणि तुम्ही तो सांगू शकला नाहीत तर तो लक्षात तरी कसा राहणार?

तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण याठिकाणी आकार हा महत्त्वाचा आहे. रंग हा दूय्यम आहे. लोगो डिझाईन करताना रंगाचा वापर हा सगळ्यात शेवटी करावा. कारण तुम्ही तयार केलेला लोगो जर ब्लॅक व्हाईट मध्ये इफेक्टिव नसेल तर कुठलाही रंग वापरून हा लोगो इफेक्टिव्ह होणार  नाही.

चौथा मुद्दा हा बरेच डिझायनर्स लक्षात घ्यायला विसरतात. तुम्ही केलेला लोगो पेनापासून होर्डिंगपर्यंत कुठेही वापरता आला पाहिजे. आणि त्याची व्हिजिबिलीटी ही तेवढीच राहिली पाहिजे.

खाली दिलेला लोगो पाहा. आपण वर बघितलेल्या मुद्द्यांचा विचर करून केलेला हा लोगो आहे. य़ुके तल्या डिस्टंन्स लर्निंगसाठीच्या ओपन युनिव्हर्सिटीचा आहे.  ओपन युनिव्हर्सिटी या कन्सेप्टचा अतिशय प्रभावी वापर इथे केलेला आढळतो (यु मध्ये ओपन ओ). आणि विशेष म्हणजे हा लोगो आधी सांगितल्याप्रमाणे पेनापासून होर्डिंगपर्यंत कुठेही वापरला जाऊ शकतो.





असा हा memorable, scalable, describable, reproducable लोगो इतर लोगोंपेक्षा वेगळा उठून दिसतो.

Post a Comment

0 Comments